Palghar Express
Saturday, June 7, 2025
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
Palghar Express
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
Palghar Express
No Result
View All Result

पालघर पोलिसांकडून घरफोडीच्या दोन गुन्ह्याची उकल चार आरोपीना अटक तर अर्धा किलो दागिने जप्त,

by vinayak Pawar
November 8, 2022
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
154
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि केळवे पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटनांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.यामध्ये एकूण चार आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास अर्धा किलो सोने चांदीचे जप्त केले आहेत.

डहाणू पोलीस स्टेशन हद्दीत ३ ऑक्टोबर रोजी डहाणू किल्ला भागातील मिलिंद अरविंद करंदीकर यांच्या घराच्या पहिल्या माळ्यावरील बेडरूममधील बाथरूमच्या काचा काढून आतमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी लोखंडी कपाटाच्या लॉकरमधले ८ लाख १२ हजार रुपये किंमती चे सोने चांदीचे दागिने चोरी करून नेले होते.याबाबत डहाणू पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी,उप अधीक्षक (गृह) शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी विविध पथके तयार करून या गुन्ह्यात कोणताही पुरावा उपलब्ध नसताना कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून सुरेश पाटील,डहाणू आणि आकाश सावंत,मीरा रोड या दोन चोरांना अटक केली आहे.त्यांच्याकडून ६,४८,३१५ रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे.

तर घरफोडीच्या दुसऱ्या घटनेत केळवे पोलीस स्टेशन हद्दीतील खटाळी येथील जिग्नेश दीपक बारी हे कुटुंबासहित नवरात्रीच्या आरतीसाठी दांडा खटाळी येथे गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या बेडरूमची बंद खिडकी उघडून घरातील कपाटातील दागिने व रोख रक्कम असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.केळवे परिसरातील वाढत्या चोरींचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या आदेशाने तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी, स्थानिक गुन्हे शाखा पालघरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गवई यांनी वेगवेगळी पथके तयार करून चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला होता.पालघर जिल्ह्यात पोलिसांकडून सुरू असलेल्या जनसंवाद अभियानामुळे प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेज मधून यातील एक चोर हा स्थानिक नागरिकांच्या ओळखीचा असल्याचे निष्पन्न झाले होते.त्यानुसार कौशल्यपूर्ण तपास करीत अजय पाटील विरार आणि कुमार कोनार मीरा रोड या दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता आरोपीनी एकूण १५ चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून एकूण १५,०८,६०० रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

Related Posts

जिल्हा

पालघर,बोईसर,विधानसभेत बंडखोरीने माहायुतीची वाढवली डोकेदुखी.

December 2, 2024
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.
ताज्या बातम्या

पालघर जिल्हा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव, बोईसर, मध्ये झझावंत प्रचार सुरू.

May 12, 2024
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.
ताज्या बातम्या

महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.

May 12, 2024
ताज्या बातम्या

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024

May 8, 2024
ताज्या बातम्या

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामधून डॉ. आदित्य अहिरे याची हकालपट्टी.

October 12, 2023
तलासरी जी.प. सूत्रकार डोंगरपाडा शाळेतीलमुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक.
ताज्या बातम्या

तलासरी जी.प. सूत्रकार डोंगरपाडा शाळेतीलमुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक.

September 29, 2023
ताज्या बातम्या

भिवंडी पोलिसांच्या कारवाईत सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त

January 17, 2023
ताज्या बातम्या

पालघर जिल्ह्यात धक्कादाय घटना आठ जणांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.

December 18, 2022

मुखपृष्ठ | जिल्हा | राज्य | देश | विदेश | मुंबई | संपादकीय | क्रीडा

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ