विनायक पवार संपादक
एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून. याप्रकरणी पाच तरुणांना सातपाटी पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
पालघर तालुक्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला काही तरुणांनी जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेले. त्यानंतर तिच्यावर आठ तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस चौकी गाठत अत्याचार करणाऱ्या तरुणांना विरोधात तक्रार दाखल केली.
सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या माहीम चौकी दुरक्षेत्रात माहीम परिसर येत असून या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपी हे पालघर तालुक्यातील रहिवासी असून बहुतांश तरुण हे गांजा, ड्रग्स नशा करणारे गर्दुल्ले असल्याचे कळते. याप्रकरणी अधिक तपास सातपाटी पोलीस करीत आहे