तलासरी जी.प. सूत्रकार डोंगरपाडा शाळेतील
मुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक
डोंगरपाडा शाळेतील
मुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक .
विनायक पवार – संपादक
तलासरि तालुक्यात शिक्षणाचा बट्याबोल उडाला आहे तलासरि तालुक्याला कायम स्वरूपी शिक्षण अधिकारी लाभले पण त्याना मदत करायला ना विस्तार अधिकारी, ना केंद्र प्रमुख त्यामुळे तालुक्यात शिक्षकांची मनमाणी वाढली आहे.
शाळावर मुलांना शिकवायला शासनाचा गलेलट्ट पगार घ्यायचा पण शाळेवर न जाता मुलांना शिकवायला प्रती दिवस 300 रुपये प्रमाणे मजुरी वर शिक्षक ठेवायचा असा धक्कादायक प्रकार तलासरी तालुक्यात उघड झाला आहे.
तलासरि तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सूत्रकार डोंगरपाडा ही इयत्ता पहिली ते चौथी पर्यत्न ची एक शिक्षकि शाळा या शाळेत फक्त चौदा मुले शिक्षण घेतात तरी सुद्धा या मुलांना शिकवायचा कंटाळा येत असल्याने गळेलट्ट पगार घेणारा शिक्षक रवी कुमार सुभाष या शिक्षकाने स्वतः घरी बसून 300 रुपये रोजदारी वर एका निवृत्त शिक्षकाला मुलांना शिकवायला ठेवले आहे पण निवृत्त शिक्षक ही काय करणार तो ही शाळा राखत निवांत बसून असल्याने मुलेही शिक्षणाची पुस्तके सोडून वर्गातच पत्ते घेउन झुगाराचा डाव खेळतांना दिसूण आली.
लोकांच्या तक्रारी वरून सूत्रकार डोंगरपाडा येथील शाळेवर बुधवारी दुपारी भेट देऊन पाहणी केली असता शाळेत प्रमुख शिक्षक रवी कुमार सुभाष फेरे उपस्थित नसून ते गणपती साठी गावी गेल्याचे समजले तसेच गावी जाताना मुलांना शिकविण्या साठी 300 रुपये रोजदारी वर रामा लोतडा या निवृत्त शिक्षकाला ठेवलेले दिसून आले
यावेळी तलासरी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी निमेश मोहिते यांना परिस्थिती सांगितली असता त्यानी तात्काळ केन्द्र्प्रमुख मदन शिंगडा यांना शाळेवर भेट देण्यास सांगितले यावेळी त्यानीं सूत्रकार डोंगरपाडा शाळेवर येऊन पाहणी केली असता रविकुमार फेरे यांनी कुठलाही रजेचा अर्ज न टाकता गावी निघून गेल्याचे तसेच गैर पद्यतीने रोजदारी वर इतर व्यक्तीला मुलांना शिकविण्यास ठेवल्याचे आढळून आल्याने तसा अहवाल शिक्षण विभागाला देण्याचे तसेच दुसरा शिक्षक शाळेवर देणार असल्याचे सांगितले.
दोषी शिक्षका वर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल असे ,भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी ,पालघर जिल्हा परिषद यांनी सांगितले.