Anchor :-
सुमारे तीन महिन्यांपूर्वी नारपोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत 18 लाख किमतीचा शेती उपयोगी येणारा निमकोटेड युरियाचा साठा जप्त केलेला असतानाच पुन्हा एकदा भिवंडी परिसरातील गोदाम पट्ट्यात सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
Vio 01 :-
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार तालुक्यातील पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील ज्योती कंपाऊंड येथील गजानन ट्रान्सपोर्ट च्या गोदामात संशयित युरियाचा साठा असल्याची माहिती ठाणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांना मिळाली असता यांच्या मार्गदर्शनाखालील पथकासह नारपोली पोलिसांनी सदरच्या गोदमा वर कारवाई केली असता तेथील गोदामात 14 लाख 12 हजार 650 व तेथे उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम एच 15 एफ व्ही 5460 या ट्रक मध्ये 4 लाख 75 हजार असा 99 हजार 350 किलो वजनाचा 18 लाख 87 हजार 650 रुपयांचा संशयित युरिया साठा आढळून आला आहे.सदर संशयित युरिया औद्योगिक वापराचा आहे की कृषी उपयोगाचा आहे याची तपासणी करण्यासाठी ठाणे कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण पथक गोदामातील युरियाचे नमुने घेऊन नाशिक प्रयोग शाळेत तपासणी साठी पाठविला जाणार आहे .त्या नंतर सदरचा संशयित साठा हा कृषी वापरातील निमकोटेड
युरिया आढळल्यास तसा तसा गुन्हा दाखल केला जाणार आहे.