Palghar Express
Friday, June 6, 2025
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
Palghar Express
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
Palghar Express
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीतील सदस्याकडून मारहाण.

by vinayak Pawar
November 13, 2022
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
210
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विनायक पवार – संपादक

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या एका जिल्हा परिषद सदस्याने जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

बेकायदेशीर रित्या बिलाची रक्कम काढण्यासाठी कर्मचाऱ्यावर दबाव टाकण्यात आला होता,परंतु तो कर्मचारी बिलाची रक्कम काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करीत नसल्याने त्याला संबंधित विभागाच्या अभियंत्याच्या उपस्थितीत मारहाण करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या शेजारील हॉटेलात मारहाण झाली होती.

जिल्हा परिषद सदस्य दुर्गम भागातून किनारपट्टी भागात जिल्हा परिषदेवर निवडून आला आहे. जिल्हा परिषदेच्या एका विभागातील ठेकेदाराच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्याला बेकायदेशीर बिलाची रक्कम काढण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.

कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याने दोन कर्मचारी,संबंधित विभागाचा अभियंता आणि जिल्हा परिषद सदस्य त्याचे एक दोन समर्थकांसह जिल्हा परिषदेच्या मुख्यालया शेजारच्या हॉटेलमध्ये चर्चा करीत बसले होते. चर्चे दरम्यान वातावरण तापल्याने संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांने कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण केली.

जिल्हा परिषदेच्या सदस्याकडून कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मारहाण करणारा सदस्य जिल्हा परिषदेचा सदस्य अध्यक्ष पदाचा दावेदार आहे. अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यास अध्यक्षांच्या दालनात कंत्राटी कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याची भीती जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी खाजगीत व्यक्त केली आहे.

चौकट :-

मारहाण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर तक्रार करू नये यासाठी मोठा दबाव असल्याने अजूनही तक्रार करण्यात आलेली नाही. प्रकरण दाबण्यासाठी जोर लावण्यात आला आहे.

Related Posts

जिल्हा

पालघर,बोईसर,विधानसभेत बंडखोरीने माहायुतीची वाढवली डोकेदुखी.

December 2, 2024
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.
ताज्या बातम्या

पालघर जिल्हा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव, बोईसर, मध्ये झझावंत प्रचार सुरू.

May 12, 2024
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.
ताज्या बातम्या

महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.

May 12, 2024
ताज्या बातम्या

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024

May 8, 2024
ताज्या बातम्या

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामधून डॉ. आदित्य अहिरे याची हकालपट्टी.

October 12, 2023
तलासरी जी.प. सूत्रकार डोंगरपाडा शाळेतीलमुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक.
ताज्या बातम्या

तलासरी जी.प. सूत्रकार डोंगरपाडा शाळेतीलमुलांच्या हाती पुस्तका ऐवजि जुगाराचे पत्ते शिक्षकांनेच ठेवला मजूरीवर शिक्षक.

September 29, 2023
ताज्या बातम्या

भिवंडी पोलिसांच्या कारवाईत सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त

January 17, 2023
ताज्या बातम्या

पालघर जिल्ह्यात धक्कादाय घटना आठ जणांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.

December 18, 2022

मुखपृष्ठ | जिल्हा | राज्य | देश | विदेश | मुंबई | संपादकीय | क्रीडा

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ