बोईसर चिल्हार मुख्य रस्त्यावर विराज कंपनीत लोखंडी स्क्रॅप वाहतूक करणाऱ्या वाहनातून लोखंडाचा गाळ रस्त्यावर पडल्यामुळे शेकडो वाहनांच्या टायरमध्ये हा लोखंडी गालातील तुकडे शिरून लाखोंचे नुकसान झाले आहे. वाहन मालकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात आला यावेळी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
तारापूर औद्योगिक वसाहती मधील पोलाद निर्मिती कंपनी मधून लोखंडाचे लहान तुकडे वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास लोखंडी तुकडे चिल्हार बोईसर रस्त्यावरील बेटेगावच्या हद्दीत टाटा हाऊसिंग भागात रस्त्यावर पडल्याने लोखंडी तुकड्यांमुळे अनेक वाहनांचे टायर वारंटी पासून वंचित होवून वाहनांचे नुकसान झाले आहे. जॅगवार सारख्या महागड्या गाडीच्या टायर मध्ये हे तुकडे गेल्याने वाहनमालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
तारापूर औद्योगिक वसाहती मधील पोलाद निर्मिती करणाऱ्या कंपनी मधून लोखंडाचे लहान तुकडे भरून निघालेला ट्रक चिल्हार बोईसर रस्त्यामार्गे वारांगडे गावच्या हद्दीतील कंपनी घेऊन जात होती. मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास असताना बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीतील टाटा हाऊसिंग समोर ट्रकच्या मागच्या भागातून लोखंडी तुकडे रस्त्यावर पडले होते.रस्त्यावर पडलेल्या लोखंडी तुकड्यांवरून वाहने गेल्याने अनेक वाहनाच्या टायरमध्ये लोखंडी तुकडे शिरून वाहनांचे नुकसान झाले आहे. यामध्ये शंभर पेक्षा अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. यात जॅगवार सारख्या कारच्या टायरचे ही नुकसान झाले आहे.
याप्रकरणी सदर लोखंडी तुकडे वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून नुकसान झालेल्या वाहनांना भरपाई दे