Palghar Express
Saturday, June 7, 2025
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
Palghar Express
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
Palghar Express
No Result
View All Result

वाणगाव येथे झालेल्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यात डॉ हेमंत सावरा यांना विजयी करून अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार – बीजेपी जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांचा नारा.

by vinayak Pawar
May 16, 2024
in राज्य
0
166
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाणगाव येथे झालेल्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यात डॉ हेमंत सावरा यांना विजयी करून अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार – बीजेपी जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांचा नारा.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी पालघर लोकसभेची निवडणूक होत असून भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. वाणगाव येथील जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे यांच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी विरोधकांवर जोरदार टिका करत महायुतीचा खासदार जिल्यातून निवडून देऊन याच जिल्यातून चार आमदार ही आम्ही महायुतीचे निवडून देऊ असे सांगत पालघर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा हे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील असा दावा राजपूत यांनी केला.

यावेळी एनडीए आघाडी देशात चारशेहून अधिक जागा जिंकेल, असे राजपूत म्हणाले. राजपूत यांनी लोकांना 20 मे रोजी घराबाहेर पडून देश पुन्हा एकदा मजबूत हातात देण्यासाठी डॉ हेमंत सवरा यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनीही आपल्या भाषणात दहा वर्षातील मोदी सरकारच्या कामांची माहिती देऊन जिल्यात पुढे होणाऱ्या विकासाची माहिती देऊन जनतेचा पाठिंबा मागितला.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी अनेक ऐतिहासिक कामे केली असून. या दहा वर्षांच्या काळात मोदी सरकारच्या काळात देशात तसेच महाराष्ट्र आणि पालघर जिल्ह्यात वेगाने विकास होत प्रतिपादन करत त्याचे सार्थक परिणाम आज जमिनीवरही दिसून येत असल्याचे पंकज कोरे यांनी आपल्या भाषणात भाषणात सांगून डॉक्टर हेमंत सावरा यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी विधान परिषद आमदार आनंद भाई ठाकूर यांनी देशासह राज्यात महायुतीने केलेल्या विकास कामाची माहिती देऊन पालघर जिल्ह्यामध्ये ही महायुतीच्या काळात अशीच विकासाची गंगा पुढे ही पालघर जिल्ह्यासह राज्यात सुरु ठेवण्यासाठी डॉक्टर हेमंत सावर यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

या महायुती कार्यकर्त्या मेळाव्यास राष्ट्रवादीचे युवा नेते व उद्योजक अमित चुरी, युवा नेते करण ठाकूर, जी. प. सदस्य देवानंद शिंगडा, बीजेपी कार्येकर्ते अमित चौबे, गौरव धोडी, ग्रामपंचायत सदस्य अक्षय धोडी, तन्मय सुमडा , सह महायुतीचे विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी उद्या वाणगाव मध्ये महामेळावा.
राज्य

पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी उद्या वाणगाव मध्ये महामेळावा.

May 14, 2024
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.
ताज्या बातम्या

पालघर जिल्हा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव, बोईसर, मध्ये झझावंत प्रचार सुरू.

May 12, 2024
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.
ताज्या बातम्या

महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगाव मध्ये झझावंत प्रचार सुरू.

May 12, 2024
जिल्हा

तारापूर च्या बंद कारखान्यात कटरच्या साह्याने लोखंडी भंगाराची चोरी करत असताना झाला स्फोट एक जण जखमी

November 4, 2022
जिल्हा

लोखंडाचे लहान तुकडे वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून रस्त्यावर महागड्या वाहनांच्या टायर चे नुकसान, वाहन चालकांकडून संताप.

November 8, 2022
जिल्हा

खदानीतून वीस वर्षांपासून अवैध गौणखनिज उत्खनन.

November 8, 2022

मुखपृष्ठ | जिल्हा | राज्य | देश | विदेश | मुंबई | संपादकीय | क्रीडा

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • जिल्हा
  • मुंबई
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • संपादकीय

© 2022 Palghar Express – WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ